कर्नाटकात शेवटच्या क्षणी भाजपचीच सत्ता येणार; अमित शहांचा मोठा दावा I Karnataka Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

मुस्लिम आरक्षणाच्या नावाखाली मागास, दलित, आदिवासी, लिंगायत आणि वोक्कलिगांचे हक्क हिरावले गेले आहेत.

Karnataka Election : कर्नाटकात शेवटच्या क्षणी भाजपचीच सत्ता येणार; अमित शहांचा मोठा दावा

Karnataka Election 2023 : कर्नाटकातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहेत, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज (मंगळवार) कर्नाटकातील यादगीर शहरात पोहोचले आहेत. इथं त्यांनी रोड शो केला. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुहेरी इंजिनचं सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला. यावेळी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.

शहा म्हणाले, प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वी काँग्रेस जिंकत असल्याची चर्चा होते, पण शेवटी भाजपचाच विजय होतो. शहा यांना राज्यातील परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'राज्यात निश्चितच पूर्ण बहुमत असलेलं भाजपचं सरकार म्हणजेच, दुहेरी इंजिन सरकार स्थापन होणार आहे.'

आरक्षणावर शहा म्हणाले, मुस्लिम आरक्षणाच्या नावाखाली मागास, दलित, आदिवासी, लिंगायत आणि वोक्कलिगांचे हक्क हिरावले गेले आहेत. त्यामुळं त्यांनी राज्यातील असंवैधानिक मुस्लिम आरक्षण रद्द केल्याचं सांगितलं. निवडणुकीपूर्वी आरक्षणात केलेल्या बदलांचा पक्ष आणि सर्वसामान्यांना फायदा होईल का? या प्रश्नावर शहा यांनी नक्कीच मिळेल, असं उत्तर दिलं.