दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EKnath Shinde with MLAs

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक‍!

सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री दहा वाजता महत्वाची बैठक‍ आहे.

मतदान संपले, कर्नाटक विधानसभा कोण जिंकणार? लवकरच जाहीर होणार एक्सिट पोल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. मतदान संपल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि VVPAT मशीन सील केले. हा व्हिडिओ हुबळी येथील नागशेट्टी कोप्पा येथील कन्नड सरकारी शाळेतील आहे.

बेळगाव जिल्ह्यात दुपारी पाच वाजेपर्यंत 66.37% टक्के मतदान

बेळगाव जिल्ह्यात दुपारी पाच वाजेपर्यंत 66.37% टक्के मतदान झाले आहे. बेळगाव ग्रामीण -55.52% बेळगाव दक्षिण -57.06% बेळगाव उत्तर -68.7% खानापूर -65.02%

न्यायव्यवस्था कोणाच्या दबावाखाली काम करत आहे की नाही, हे उद्या ठरेल - संजय राऊत

हा देश संविधानाने चालतो की नाही हे उद्या ठरवले जाईल… देशात लोकशाही जिवंत आहे की नाही. आपली न्यायव्यवस्था कोणाच्या दबावाखाली काम करत आहे की नाही, हेही उद्या ठरवले जाईल. हा देश संविधानाने चालतो आणि जो देश राज्यघटनेने चालत नाही तो पाकिस्तानची अवस्था बघा. हा देश संविधानानुसार चालावा, आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र असावी, अशी आमची इच्छा आहे - खासदार संजय राऊत, मुंबई

कर्नाटक निवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ५२.०३% मतदान झाले.

सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच, मोठी अपडेट

गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षाचा निकाल १५ तारखेच्या आत लागणार असं कायदेतज्ज्ञ सांगत होते. पण सुत्रांच्या माहितीनुसार सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सामने दिलेल्या माहितीनुसार, १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल उद्या निकाल लागणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात दुपारी १ वाजे पर्यंत ३७.०१% मतदान

बेळगाव जिल्ह्यात दुपारी १ वाजे पर्यंत ३७.०१% मतदान झाले आहे.

आदित्य ठाकरे घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट

युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे राज्यपाल रमेश बैस यांचं राजभवन येथे भेट घेणार आहेत. आज दुपारी २ वाजता आदित्य ठाकरे राजभवन येथे जाणार आहेत. राज्यातील विद्यापीठ यांच्याशी संबंधित असलेले आणि अन्य काही विषयावर ते राज्यपाल यांची भेट घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली खरीप आढावा बैठक 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज खरीप आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पेरणीसाठी शेतकऱ्यांना योग्य बियाणे उपलब्ध करुन देणार. बियाणांमध्ये फसवणूक झाली तर त्याची भरपाई मिळते. केवळ त्याची पावती जपून ठेवण गरजेचं असतं.

नंदुरबार शहादामधील बस स्थानकाजवळील इमारतीला आग

नंदुरबार शहादामधील बस स्थानकाजवळील इमारतीला आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

पत्राचाळ घोटाळ्याची सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब 

पत्राचाळ घोटाळ्याची सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. देशाबाहेर जाताना तपास यंत्रणांची परवानगी घेऊ असं राऊत यांच्या वकिलांनी म्हंटलं आहे.

न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर बसून राहणार; प्रकल्पग्रस्त शेतकाऱ्याने महामार्गावर आंदोलन 

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या कामथे घाटात वाहतुकीची कोंडी झाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकाऱ्याने महामार्गावर आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी. न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर बसून राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

मतदानानंतर सुधा मूर्तींनी जनतेला मतदान करण्याचं केलं आवाहन

लेखिका सुधा मूर्ती यांनी आज सकाळी 7 वाजता सुरू झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेंगळुरूच्या जयनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांचे पती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्यासमवेत त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.

संजय राऊत कोर्टात हजार; पत्राचाळ घोटाळ्यावरील आरोप निश्चितीवर सुनावणी 

'गॅस सिलिंडरकडे बघा आणि मगच मतदान करा' कॉंग्रेस नेत्याचे आवाहन

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि कनकापुरा येथील पक्षाचे उमेदवार डीके शिवकुमार यांनी गॅस सिलिंडरकडे बघा आणि मगच मतदान करा असं आवाहन केलं आहे.

नागपुर-वर्धा महामार्गावर अपघात; 10 प्रवासी जखमी 

नागपुर-वर्धा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 10 प्रवासी जखमी झाले आहेत. सेलू येथील रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

कंग्राळी खुर्द बूथ क्रमांक 38 मधील मतदान यंत्रात बिघाड दीड तास उशिरा मतदान सुरु

कंग्राळी खुर्द बूथ क्रमांक 38 मधील मतदान यंत्रात बिघाड दीड तास उशिरा मतदान सुरु झाले. या बूथवर सकाळी 9 ला मतदारांनी मोठी गर्दी केली. कर्मचाऱ्यांचे काम ही संथ गतीने सुरू आहे. तर मतदारात नाराजी दिसून येत आहे. मतदानासाठी किमान दीड तास लागत आहे.

काँग्रेसला 130 पेक्षा जास्त जागा मिळतील, ते 150 जागांपर्यंतही जाऊ शकते- सिद्धरामय्या

काँग्रेसला 130 पेक्षा जास्त जागा मिळतील, ते 150 जागांपर्यंतही जाऊ शकते, असे मी सतत सांगत आलो आहे असं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हंटलं आहे.

बसवराज बोम्मई 50,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील; बोम्मई यांच्या पत्नीचा विश्वास 

बसवराज बोम्मई 50,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील. भाजप निवडणूक जिंकेल आणि 150 पेक्षा जास्त जागा मिळवतील,कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पत्नींनी व्यक्त केला विश्वास.

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, 5 कोटी 31 लाख मतदार बजावणार हक्क

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज होत आहे. मतदार कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता येणार हे आज ठरवणार आहेत. आज (10 मे) सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

पुणे महापालिकेने पाणी पुरवठा संबधित मोठा निर्णय

पुणे महापालिकेने पाणी पुरवठा संबधित एक मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेने येत्या १८ मेपासून म्हणजेच दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालासाठी उत्कंठा शिगेला

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालासाठी उत्कंठा शिगेला, पण निकाल आजही नाही. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाची यादी जाहीर, पण निकालाचा समावेश नाही.

निकालासाठी आता फक्त उरले 2 दिवस 11, 12 मे हे कामकाजाचे दिवस, 15 मे न्यायमूर्ती शाह यांच्या निवृत्तीचा दिवस

जातीय राजकारणाविरोधात मतदान करा; प्रकाश राज यांचे आवाहन

अभिनेते प्रकाश राज यांनी मतदान केल्यानंतर प्रकाश राज यांनी इतर मतदारांना आवाहन केले आहे. आम्हाला जातीय राजकारणाविरोधात मतदान करायचे आहे. आपल्याला कर्नाटक सुंदर बनवायचे आहे. अस प्रकाश राज यांनी म्हटले आहे.

येडियुरप्पांचे मुलासाठी देवाला साकडे

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा आपल्या कुटुंबासह शिकारीपूर येथील श्री हुच्चराया स्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्यांचा मुलगा बी.वाय. विजयेंद्र विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

कर्नाटकातील २२४ मतदारसंघांसाठी आज एकाच दिवशी मतदान होत आहे. राज्यात ५ कोटी ३१ लाख ३३ हजार मतदार असून, त्यांच्यासाठी ५८,५४५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. शनिवार, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रचार केला. मतदानाच्या एक दिवस आधी मंगळवारी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही हनुमानाच्या चरणी लीन झाले.

टॅग्स :Karnataka