PM Modi News : पंतप्रधानांचे कटआऊट पुसतानाचा वृद्धाचा Video Viral; गृहमंत्र्यांनी केलं कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karnataka election 2023 man seen cleaning pm narendra modi cutout amit shah praised watch viral video

PM Modi News : पंतप्रधानांचे कटआऊट पुसतानाचा वृद्धाचा Video Viral; गृहमंत्र्यांनी केलं कौतुक

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 दरम्यान राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान निवडणूकीच्या प्रचारादरम्यान शुक्रवारी जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांचा रोड शो रद्द करावा लागला.

गृहमंत्र्यांचा रोड शो रद्द झाला असला तरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ स्वतः अमित शाह यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट आणि धोतर घातलेला एक वृद्ध पावसामुळे भिजलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कटआउट पुसताना दिसत आहे. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा त्याला विचारले की आपण हे काम पैशासाठी करत आहोत, तेव्हा त्या वृद्धाने आपल्याला काही गरज नसल्याचे उत्तर दिले. त्या व्यक्तीने सांगितले की, मला पैशाची गरज नाही, मी हे फक्त माझ्या प्रेम आणि त्याच्यावरील विश्वासासाठी करत आहे. भावनेच्या भरात त्या वृध्दाने सांगितले की - मोदी आमच्यासाठी देव आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शाह म्हणाले की- कर्नाटकच्या देवनहल्लीचा हा सुंदर व्हिडिओ पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतूट विश्वास आणि त्यांच्याबद्दल निस्वार्थ प्रेम भाजपने कमावले आहे. शाह यांच्याशिवाय कर्नाटकातील भाजपनेही या व्हिडिओवर ट्विट केले आहे.