कर्नाटकात 70 टक्के मतदान 

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

त्रिशंकू विधानसभेचा अंदाज कर्नाटक विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या अंदाजांनुसार, बहुमत कोणत्याही पक्षाला मिळण्याची शक्‍यता दिसत नाही. मात्र, काही अंदाजांमध्ये कॉंग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्‍यता दिसत असल्यामुळे हा पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हेही आहेत. बहुमत कोणालाच मिळाले नाही, तर धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) "किंगमेकर'च्या भूमिकेत येऊ शकतो. 
लोकसभेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यातही पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल यांची ही पहिलीच कसोटी आहे. 

बंगळूर - कर्नाटक विधानसभेसाठी आज सुमारे 70 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 2013 च्या निवडणुकीत हेच प्रमाण 71.4 टक्के होते. मतमोजणी 15 मे रोजी होईल. चिकबल्लापूर आणि रामनगर मतदारसंघांत सर्वाधिक म्हणजे 76 टक्के, तर बंगळूर शहरी भागात सर्वांत कमी म्हणजे 48 टक्के मतदान झाले. विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी आज मतदान झाले. 

त्रिशंकू विधानसभेचा अंदाज कर्नाटक विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या अंदाजांनुसार, बहुमत कोणत्याही पक्षाला मिळण्याची शक्‍यता दिसत नाही. मात्र, काही अंदाजांमध्ये कॉंग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्‍यता दिसत असल्यामुळे हा पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हेही आहेत. बहुमत कोणालाच मिळाले नाही, तर धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) "किंगमेकर'च्या भूमिकेत येऊ शकतो. 
लोकसभेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यातही पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल यांची ही पहिलीच कसोटी आहे. 

विविध अंदाज असे - 

कर्नाटक विधानसभा 
- एकूण जागा - 222 
- बहुमतासाठी - 112

इंडिया टुडे-ऍक्‍सिस 
- भाजप - 79-92 
- कॉंग्रेस -  106-118 
- जेडीएस - 22-30 

न्यूज एक्‍स-सीएनएक्‍स 
- भाजप - 102-110 
- कॉंग्रेस - 72-78 
- जेडीएस - 35-39 

सुवर्णा न्यूज-24/7 
- भाजप - 79-92 
- कॉंग्रेस - 106-118 
- जेडीएस - 22-30 

टाइम्स नाऊ-व्हीएमआर 
- भाजप - 80-93 
- कॉंग्रेस - 90-103 
- जेडीएस - 31-39 

एबीपी न्यूज-सीव्होटर 
- भाजप - 97-109 
- कॉंग्रेस - 87-99 
- जेडीएस - 21-30 
- अन्य -    1-7 
--- 
इंडिया टीव्ही-व्हीएमआर 
- भाजप - 87 
- कॉंग्रेस - 97 
- जेडीएस - 35 
- अन्य - 3 
 
Web Title: in karnataka election 70 % voting