कर्नाटकातील महिलांना मोफत मंगळसूत्र, स्मार्टफोनचे आश्वासन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

राज्यातील गरीब जनता, महिला आणि शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील 20 लाख शेतकऱ्यांना 10 हजारांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. 

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर आता भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये गरीब महिलांना मोफत मंगळसूत्र आणि स्मार्टफोन देण्याची घोषणा करण्यात आली. तर दुष्काळग्रस्त भागांतील 20 लाख शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. 

voting

येत्या 12 मेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक राहिला आहे. भाजपने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला आणि या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. राज्यातील गरीब जनता, महिला आणि शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील 20 लाख शेतकऱ्यांना 10 हजारांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. 

याशिवाय गरीब महिलांना मोफत मंगळसूत्र आणि स्मार्टफोन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना 2 लाखांपर्यंतचे कर्ज फक्त 1 टक्का व्याजाने देण्याबरोबरच अन्य काही महत्वपूर्ण घोषणाही यामध्ये करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दहा तास मोफत वीज देण्यात येणार आहे. सिंचन योजनेसाठी दीड लाख कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासनही यामध्ये देण्यात येणार आहे.  

Web Title: Karnataka Election BJP Manifesto Financial aid to 20 lakh farmers in Karnataka