राहुल गांधी, अमित शहा यांच्या विमानांची आयोगाकडून तपासणी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे. राहुल गांधी हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर अमित शहा यांनीही प्रचाराचा धडाका सुरुच ठेवला आहे. मंगळवारी या दोघांची हुबळी विमानतळावर आगमन होताच या दोघांच्या विमानांची कर्नाटक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी जिल्हा स्तरावरील तीन अधिकारी उपस्थित होते.

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरु असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणूक आयोगाने या दोघांच्याही खासगी विमानांची हुबळी विमानतळावर तपासणी केली.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे. राहुल गांधी हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर अमित शहा यांनीही प्रचाराचा धडाका सुरुच ठेवला आहे. मंगळवारी या दोघांची हुबळी विमानतळावर आगमन होताच या दोघांच्या विमानांची कर्नाटक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी जिल्हा स्तरावरील तीन अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाचे जिल्हा उपाध्यक्ष एस. बी. बोमन्नाहल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुका निष्पक्ष करण्याच्या हेतूने ही तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाचे अधिकारी करपले यांच्या नेतृत्वाखाली तपासणी करण्यात आली. कर्नाटकमध्ये 224 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Web Title: karnataka election commission checked amit shah and rahul gandhi aircraft