
शिवकुमार यांनी धजद उमेदवार बी. नागराजू यांचा १,२२,३९२ इतक्या प्रचंड मताधिक्क्याने पराभव केला आहे.
Karnataka Election Result : DK शिवकुमार तब्बल लाख तर माजी मंत्री गुंडुराव फक्त 105 मतांनी विजयी
बेळगाव : राज्यात सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होण्याचा मान माजी मंत्री तसेच काँग्रेसचे उमेदवार डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी मिळविला आहे. तर सर्वात कमी मताधिक्क्याने माजी मंत्री तसेच काँग्रेस उमेदवार दिनेश गुंडुराव (Dinesh Gundurao) विजयी झाले आहेत.
अशोक यांना केवळ १९,७५३ मते (Karnataka Election Result 2023) मिळाली. तर दुसऱ्या स्थानावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे बी. नागराजू राहिले. त्यांना २०,६३१ मते मिळाली. काँग्रेसचे विजयी उमेदवार डी. के. शिवकुमार यांना १,४३,०२३ मते मिळाली.
शिवकुमार यांनी धजद उमेदवार बी. नागराजू यांचा १,२२,३९२ इतक्या प्रचंड मताधिक्क्याने पराभव केला आहे. दरम्यान, सर्वात कमी मताधिक्क्याने काँग्रेस उमेदवार दिनेश गुंडूराव हे गांधीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी ठरले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सप्तगिरी गौडा यांची या ठिकाणी थोडक्यात संधी हुकली आहे. केवळ १०५ मतांनी श्री. गुंडूराव विजयी ठरले. त्यांना ५४,११८ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सप्तगिरी गौडा यांना ५४,०१३ मते मिळाली.