Karnataka Election Result: भाजपच्या पराभवाचा आनंद कॉंग्रेस कार्यकर्त्यांना महागात, फटाके फोडताना.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election Result

Karnataka Election Result: भाजपच्या पराभवाचा आनंद कॉंग्रेस नेत्यांना महागात, फटाके फोडताना..

कर्नाटकात जवळपास भाजपचा पराभव झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत डी. के. शिवकुमार १ लाख मतांनी विजयी झाले आहेत. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. फटाके फोडताना काँग्रेस नेता थोडक्यात बचावला. (Karnataka Election Result Congress leaders narrowly escaped while bursting firecrackers )

कर्नाटकात निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान, सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साह साजरा करताना दिसत आहेत. अशातच मोठी दुर्घटना घडताना थोडक्यात टळली.

नेमकं झालं तरी काय?

फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे. तोल गेल्याने त्यांच्या हातातला बॉक्स जमिनीवर पडतो. मात्र फटाके फुटत राहतात. त्यात ते तो बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करतात, तितक्यात एक फटाका फुटतो आणि त्यांच्या डोळ्याच्या जवळून निघतो. सुदैवाने नेता थोडक्यात बचावतो.

फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे. तोल गेल्याने त्यांच्या हातातला बॉक्स जमिनीवर पडतो. मात्र फटाके फुटत राहतात. त्यात ते तो बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करतात, तितक्यात एक फटाका फुटतो आणि त्यांच्या डोळ्याच्या जवळून निघतो.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून राज्यात काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रेंडमध्ये पक्ष 123 जागांवर आघाडीवर दिसत आहे.