Karnataka Election Result :निकालाआधीच काँग्रेसमध्ये दोन गट? राजकीय घडामोडींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election Result

Karnataka Election Result : निकालाआधीच काँग्रेसमध्ये दोन गट? राजकीय घडामोडींना वेग

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. अशातच निकालापूर्वी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. काँग्रेसच्याच एका नेत्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. (Karnataka Election Result Two factions in Congress over the post of Chief Minister)

एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवडणूक निकालाला अवघे काही तास उरले असताना मुख्यमंत्रीपदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची अफवा ४० टक्के भ्रष्टाचारवाले लोक करत आहेत. यातील काही लोक सिंगापूरला तर काही लोक बँकॉकला जात आहेत, अशी टोलेबाजी गौरव वल्लभ यांनी केली. टी व्ही९ शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले गौरव वल्लभ?

मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारलं असता गौरव वल्लभ म्हणाले, “४० टक्के भ्रष्टाचारवाले आणि कमिशनवाले जे लोक आहेत, ते अशा अफवा पसरवत आहेत. त्यातील काहीजण सिंगापूरला जात आहेत, काहीजण बँकॉकला जात आहेत. ते सिंगापूर आणि बँकॉकला का जातायत? ते मला माहीत नाही.

पण आम्हाला बंगळुरूमध्ये राहून लोकांची सेवा करायची आहे. आम्हाला शिमोगामध्ये राहायचं आहे. ते सिंगापूर फिरत आहेत. त्यांना शिमोगाबद्दल इतकी घृणा का आहे? आणि सिंगापूरवर इतकं प्रेम का आहे? हे माहीत नाही.” असे अनेक सवाल उपस्थित करत पक्षातीलच नेत्यांना टोमणे हाणले आहेत.

टॅग्स :Karnataka