सिद्धरामय्या बदामीतून विजयी; चामुंडेश्वरीत पराभव

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होती, देवेगौडा यांचा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावेल असे चित्र होते. मात्र भाजपने सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येत सत्ता स्थापनेपर्यंत पोचले आहेत.

बेंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचाही एका जागेवर पराभव झाला आहे. सिद्धरामय्या यांनी बदामीत विजय मिळविला, तर चामुंडेश्वरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून, भाजप सत्ता स्थापनेच्या मार्गावर आहे. दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना चांमुडेश्वरीत पराभव स्वीकारावा लागला.

कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होती, देवेगौडा यांचा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावेल असे चित्र होते. मात्र भाजपने सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येत सत्ता स्थापनेपर्यंत पोचले आहेत.

बदामी मतदारसंघातून सिद्धरामय्या यांच्याविरोधात भाजपने बी. श्रीरामुलू यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने येथे गेल्या निवडणुकीत विजय मिळविला होता. यावेळीही ही जागा राखण्यात यश आले आहे. तर, पाचवेळा निवडून आलेल्या चामुंडेश्वरी येथे सिद्धरामय्या यांचा पराभव झाला आहे. त्यांना जेडीएसचे उमेदवार जीटी देवेगौडा यांनी पराभूत केले.

बदामीत सिद्धारामय्या यांना 67599 मते मिळाली, तर श्रीरामुलू यांना 65903 मते मिळाली, याठिकाणी अवघ्या 1696 मतांनी विजय मिळाला. तर, चामुंडेश्वरीमध्ये सिद्धरामय्या यांना 34511 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

Web Title: Karnataka Election Results Siddaramaiah wins Badami, loss in Chamundeshwari