'ही' निवडणूक भाजप-काँग्रेसमध्ये नाही तर, टिपू विरुध्द सावरकर यांच्यात होणार; BJP नेत्याचं वादग्रस्त विधान | Karnataka Assembly Election 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Assembly Election

'ही' निवडणूक भाजप-काँग्रेसमध्ये नाही तर, टिपू विरुध्द सावरकर यांच्यात होणार; BJP नेत्याचं वादग्रस्त विधान

Karnataka Assembly Election 2023: मे 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसनं त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केलीये.

भाजपला (BJP) सत्तेत परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा एकापाठोपाठ एक कर्नाटक दौरा करत आहेत.

राज्याच्या निवडणुकीत विकासावर भर देणाऱ्या आणि कर्नाटकचा बालेकिल्ला स्वबळावर जिंकू पाहणाऱ्या भाजपनं आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधानं करून नवा वाद निर्माण केलाय.

विकासाऐवजी 'लव्ह जिहाद'वर निवडणूक लढवण्याच्या वादग्रस्त विधानानंतर ही निवडणूक टिपू विरुद्ध सावरकर यांच्यात असल्याचं भाजप अध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी म्हटलंय.

लोकसभेच्या खासदारानं शिवमोग्गा येथील जाहीर भाषणात सांगितलं की, यावेळच्या कर्नाटक विधानसभा निवडणुका काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) लढल्या जाणार नाहीत, तर सावरकर आणि टिपू यांच्या विचारसरणीमध्ये लढल्या जातील."

कर्नाटक भाजप अध्यक्ष कटील यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार म्हणाले, भाजप नेत्यानं सर्वात वाईट विधान केलंय. ते देशाचं विभाजन करत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.