भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना 100 कोटींची 'ऑफर' : कुमारस्वामी

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

''आम्हाला दोन्ही बाजूंनी 'ऑफर' आली आहे. मी हे किरकोळ समजत नाही. 2004 आणि 2005 मध्ये भाजपसोबत जाणे हा माझ्या वडिलांच्या राजकारणातील 'काळा डाग' आहे. त्यामुळे आता देवाने हा 'डाग' काढण्याची संधी मला दिली आहे. त्यामुळे मी आता काँग्रेससोबत जाणार आहे''.

- कुमारस्वामी, जेडीएस, नेते

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस-जेडीएसकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही पक्षांकडून बहुमतासाठी असलेली 'मॅजिक फिगर' जुळविण्याचे प्रयत्न केले जात असताना जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ''भाजपकडून आमच्या आमदारांना 100 कोटींची 'ऑफर' देण्यात आली आहे'', असे कुमारस्वामी यांनी सांगितले. 

कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. कुमारस्वामी म्हणाले, 'ऑपरेशन कमल' हे यशस्वीपणे होण्याचे विसरा. जे लोक भाजपला सोडू इच्छितात त्यांनी आमच्याकडे यावे. आम्ही राज्यपालांना सांगत आहोत, घोडेबाजाराला वाव मिळू नये असा निर्णय देणे टाळावे. राज्यपाल वजुभाई वाला यांची आम्ही भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा आम्ही केला आहे''. 

''आम्हाला दोन्ही बाजूंनी 'ऑफर' आली आहे. मी हे किरकोळ समजत नाही. 2004 आणि 2005 मध्ये भाजपसोबत जाणे हा माझ्या वडिलांच्या राजकारणातील 'काळा डाग' आहे. त्यामुळे आता देवाने हा 'डाग' काढण्याची संधी मला दिली आहे. त्यामुळे मी आता काँग्रेससोबत जाणार आहे'', असे कुमारस्वामी म्हणाले.  

Web Title: Karnataka Government Formation BJP offering Rs 100 crore to our MLAs Kumaraswamy alleges