
Dearness Allowance : कर्नाटकात काँग्रेस सरकार येताच कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात केली वाढ
बंगळूरुः कर्नाटकमध्ये काँग्रेसने दणदणती विजय मिळवला आहे. आज कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेत सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. महागाई भत्त्यामध्ये तब्बल ४ टक्क्यांनी वाढ केलीय.
कर्नाटकातले सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलास मिळला आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्याची घोषणा केली. १ जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळेल. आता एकूण ३५ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या वेतनामध्ये वाढ होणार आहे. यापूर्वी हरियाणा सरकारने डीएमध्ये ४ टक्के वाढ केली होती. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के केलेला आहे. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ होत आहे.
दरम्यान, राजस्थानच्या गहलोत सरकारने 25 मार्च रोजी राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठं गिफ्ट दिलं. राजस्थान सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली. गहलोत सरकाच्या या निर्णयामुळे महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे.
राजस्थान सरकारच्या या निर्णयामुळे ८ लाख सरकारी कर्मचारी आणि ४.४० लाख पेन्शनर्सना लाभ मिळेल. या निर्णयाचा लाभ राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक यांच्यासह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही मिळेल.