कर्नाटक सरकार संकटात; दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा

कर्नाटक सरकार संकटात; दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा

नवी दिल्ली- कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार हादरले असून दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सरकार कोसळण्याच्या चर्चेतील हा ट्रेलर असल्याचे बोलले जात आहे.

अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आज मकरसंक्रांत आहे. त्यामुळे याच दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार हे कार्यक्षम असलं पाहिजे, असे अपक्ष आमदार आर. शंकर म्हणाले आहेत. तर, आमदार एच. नागेश म्हणाले की, एका चांगल्या आणि स्थिर सरकारसाठी मी कर्नाटकतील युती सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे स्थिर सरकार स्थापण्यासाठी मी भाजपासोबत जाण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपानं काँग्रेसचे काही आमदार गळाला लावले असून, 17 जानेवारीपर्यंत भाजपा सरकार पाडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला होता. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आला होता.

सध्या, कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. तर भाजपाच्या आमदारांची संख्या 104 इतकी आहे. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांना आता तो पाठिंबा काढून घेतला आहे. यासोबतच बहुजन समाज पार्टीचा एक आमदारदेखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 119 वर होतं. विधानसभेतील आमदारांची संख्या 207 वर आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत बहुमताचा आकडा 104 होईल. भाजपाकडे सध्या इतकेच आमदार आहेत. मात्र यासाठी भाजपाला सत्तेत असलेल्या 16 आमदारांचे राजीनामे आवश्यक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com