कर्नाटकमध्ये हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारांचा कहर, रस्त्यावर उन्मळून पडली झाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

Heavy Rain : कर्नाटकमध्ये हाहाकार! मुसळधार पाऊस आणि गारांचा कहर, रस्त्यावर उन्मळून पडली झाडे

कर्नाटकची राजधानी बंगळुरूसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. बंगळुरूतील पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत.

बंगळुरूमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. ANI या वृत्तसंस्थेने आपत्तीग्रस्त भागांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत ज्यात रस्त्यावर पडलेली झाडे दिसतात.

काही झाडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरही पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

आज (रविवार) दुपारी बंगळुरूमध्ये अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस पडला, यादरम्यान अनेक ठिकाणाहून गारपिटीच्या बातम्या आल्या आहेत, शहरात अजूनही पाऊस पडत आहे, त्याचा वेग कमी झाला असला तरी पाऊस या दरम्यान जोरदार वारा वाहू लागला हवामान खात्याने याआधीच येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. (rain update)

टॅग्स :Karnatakarain