शरद पवार सीमाप्रश्नी करणार वकील साळवेंशी चर्चा

शरद पवार सीमाप्रश्नी करणार वकील साळवेंशी चर्चा

बेळगाव - सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाला लवकरच चालना देण्यासाठी माजी कृषी मंत्री शरद पवार सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीष साळवे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सोमवारी नगर येथे शरद पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्‍नी चर्चा केली. यावेळी श्री. पवार यांनी न्यायालयीन कामकाजाबाबत दळवी यांना काही सूचना केल्या असून, त्याची अंमलबजावणी करा, असे सांगितले आहे.

‘गेल्या काही महिन्यांपासून रोस्टर पद्धतीमुळे सर्वोच्च न्यायालयात सुणावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे मराठी भाषिकांत सुनावणी कधी होणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. सीमाप्रश्‍नी लवकर सुनावणी होऊन सीमावासीयांना न्याय मिळावा, यासाठी वकिलांशी चर्चा करावी,’ अशी मागणी दीपक दळवी यांनी केली.

पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात नूतन सरन्यायाधीशांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे लवकर सुनावणी व्हावी, याकरिता ॲड. हरीष साळवे व इतर वकिलांशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कामकाजास चालना देण्यात येईल, असे सांगत पवार यांनी येणाऱ्या काळात सीमाप्रश्‍नी कशा प्रकारे काम करावे लागेल, याबाबत मार्गदर्शन केले.

लवकरच शिष्टमंडळ मुंबईकडे
शरद पवार यांनी न्यायालयीन कामकाजाबाबत काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत महाराष्ट्र एकिकरण समितीचे शिष्टमंडळ वकील व महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती दीपक दळवी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com