कर्नाटकचे मंत्री मॅरेथॉनमध्ये लुंगीवर धावले अन्...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

दसऱ्यानिमित्त म्हैसूरमध्ये दरवर्षी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. पुरुष आणि महिला गटात 21.1 किमी अंतरची ही मॅरेथॉन असते. कर्नाटक सरकारच्या सहकार्याने ही मॅरेथॉन घेतली जाते.

म्हैसूर : म्हैसूरमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये कर्नाटकचे उच्चशिक्षण मंत्री जी. टी. देवेगौडा चक्क लुंगीवर धावले आणि धावताना ते रस्त्यावर कोसळले.

कर्नाटकातील पारंपारिक पोशाख असलेली लुंगी घालून देवेगौडा मॅरेथॉनमध्ये धावू लागले. काही अंतर धावल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावरच कोसळले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना उचलले. त्यांच्या पायाला व तोंडाला दुखापत झाला असून, रुग्णालयात नेण्यात आले.

दसऱ्यानिमित्त म्हैसूरमध्ये दरवर्षी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. पुरुष आणि महिला गटात 21.1 किमी अंतरची ही मॅरेथॉन असते. कर्नाटक सरकारच्या सहकार्याने ही मॅरेथॉन घेतली जाते.

Web Title: Karnataka Minister Trips and Falls While Running a Marathon in Lungi