कर्नाटकात नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे छापे

संजय सूर्यवंशी
शुक्रवार, 9 मार्च 2018

बंगळूर - राज्यभरातील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आज एकाच वेळी छापे टाकले. या सर्व अधिकाऱ्यांनी  बेहिशोबी मालमत्ता जमविल्याची माहिती मिळाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी सहा वाजल्यापासून एकाच वेळी शॉक दिला. यामध्ये सर्वांकडून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता व रोकड जप्त होण्याची शक्यता आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील हिप्परगी जलाशयाच्या विशेष भूसंपादन अधिकारी राजश्री ऐनापुरे यांचाही समावेश आहे.

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सात जिल्ह्यांमधील नऊ अधिकाऱ्यांवर छापे टाकले. यामध्ये बेळगाव, कोप्पळ, विजापूर, कोलार, मंगळूर व तुमकुर जिल्ह्याचा समावेश आहे. पूर्वीच्या बेळगावच्या प्रांताधिकारी व  सध्या हिप्परगी जलाशय विशेष भू संपादन अधिकारी  म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री जैनापुरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी  ठिकठिकाणी छापे टाकले. त्यांच्या विजापूर, हुबळी व बेळगाव येथील मालमत्तांची एकाच वेळी चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्या दुसऱ्या पतीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.  

मंगळूर येथील अबकारी उपाधीक्षक विनोद कुमार, कोलार येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता अप्पीरेड्डी, कोप्पळ जिल्हा पंचायतीचे अभियंता, तुमकुर कृषी सहाय्यक निरीक्षक यांच्यासह नऊ जणांवर हे छापे टाकले आहेत.

Web Title: Karnataka News Belgaum News Impressions of Anti Corruption Prevention Department on 9 senior officials