पिसाळलेल्या गोमातेच्या हल्ल्यातून बहिणीने वाचविले भावाला

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

कारवार (कर्नाटक): पिसाळलेल्या गोमातेच्या हल्ल्यातून आठ वर्षाच्या धाडसी बहिणीने आपल्या भावाला वाचविले आहेत. संबंधित छायाचित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

कारवार (कर्नाटक): पिसाळलेल्या गोमातेच्या हल्ल्यातून आठ वर्षाच्या धाडसी बहिणीने आपल्या भावाला वाचविले आहेत. संबंधित छायाचित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

होन्नावर तालुक्यातील नविलागावात मंगळवारी (ता. 13) ही घटना घडली. गावातील किरण शेठ यांना तीन मुले आहेत. आरती (वय 8) ही मधली मुलगी. शिवरात्री निमित्त मंगळवारी शाळेला सुट्टी होती. घरासमोरच्या आवारामध्ये ती आपल्या कार्तिक (वय 2) या छोट्या भावाला तिनचाकी सायकलवर बसवून खेळवत होती.  यावेळी वेगाने पळत आलेल्या गायीने कार्तिकवर हल्ला केला. आरतीने तत्काळ कार्तिकला कडेवर उचलून घेत खांबाचा आधार घेतला. शिवाय, गायीचा हल्ला स्वतःवर घेत तिने भावाला या हल्ल्यातून वाचविले. संबंधित छायाचित्रीण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

आरती म्हणाली, 'गायीने अचानक भावावर हल्ला केला. यामुळे विचार करायला वेळच मिळाला नाही. फक्त भावाला वाचविणे एवढा एकच विचार डोक्यात आला. गायीच्या हल्ल्यातून मी भावाला वाचवू शकले यामुळे देवाला धन्यवाद.'

आरतीचा आम्हाला अभिमान असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. सीसीटीव्हीमधील छायाचित्रण पाहिल्यानंतर घाबरायला होते. या हल्ल्यातून तिने कार्तिकला वाचविले आहे. बहुदा कार्तिकने लाल रंगाचा शर्ट घातला असल्यामुळे गायीने हल्ला केल्याची शक्यता आहे. पण, आरतीने मोठे धाडस दाखवून हा हल्ला परतून लावला. गावातील नागरिकांसह तिच्या शिक्षकांकडून आरतीचे कौतुक होत आहे.

Web Title: Karnataka news brave sister saves brother from charging cow