विधानसभा पोटनिवडणूक ; कर्नाटक, पंजाबमध्ये काँग्रेस विजयी

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

कर्नाटकात काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना 41162 मतांनी विजयी झाले. तर पंजाबच्या शाहकोट विधानसभा जागेवर काँग्रेसचे उमेदवार हरदेवसिंह लाडी विजयी झाले असून, त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार नायब सिंह कोहर यांचा 38802 मतांनी पराभव केला आहे. 

नवी दिल्ली : लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या दहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. कर्नाटक आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुनीरत्ना 41162 मतांनी विजयी झाले. तर पंजाबच्या शाहकोट विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार हरदेव सिंह लाडी विजयी झाले आहेत.

कर्नाटकच्या आरआर नगर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी टि्वटवरून यावर प्रतिक्रिया दिली. ''आरआर नगर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने जेडीएसला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही. मात्र, या मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याचे खात्री करण्यात येत आहे'', असे टि्वट कुमारस्वामी यांनी केले.  

कर्नाटकात काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना 41162 मतांनी विजयी झाले. तर पंजाबच्या शाहकोट विधानसभा जागेवर काँग्रेसचे उमेदवार हरदेवसिंह लाडी विजयी झाले असून, त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार नायब सिंह कोहर यांचा 38802 मतांनी पराभव केला आहे. 

दरम्यान, उत्तराखंडमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, पंजाबमध्ये 13 व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार 31000 मतांनी आघाडीवर आहेत.

Web Title: Karnataka Punjab Assembly Bypoll election congress candidate won