अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणी महंत शिवमूर्तींची पोलिस कोठडीत रवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivamurthy Murugha Sharanaru

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणी महंत शिवमूर्तींची पोलिस कोठडीत रवानगी

बंगळुरू - अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा आरोप असलेल्या महंत शिवमूर्ती यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी रात्री महंत यांना ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Karnataka sexual abuse case news in Marathi)

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

दरम्यान तुरुंगात छातीत दुखू लागल्याने मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती यांना शुक्रवारी बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.

माध्यमिक शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्याना ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महंत यांनी तुरुंगात छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि इतर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. शेजारच्या दावणगेरे येथून दोन हृदयरोगतज्ज्ञांनाही बोलावण्यात आले होते.

तक्रारीनुसार, मठ संचलित शाळेत शिकणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींवर आरोपीने साडेतीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले. आरोपीवर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Karnataka Sexual Abuse Case Murugha Mutt Pontiff Sent To Police Custody For 4 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnatakacrime