‘चामुंडेश्‍वरी’चा वरदहस्त मिळालाच नाही

Badami-Chamundeshwari-Result
Badami-Chamundeshwari-Result

बंगळूर - मुख्यमंत्रिपदी विराजमान होताना ‘चामुंडेश्‍वरी’त पराभवाचा डाग लागू नये म्हणून बदामीतूनही सिद्धरामय्या यांना काँग्रेसने रिंगणात उतरविले. अतिशय सावध पवित्रा घेऊनही चामुंडेश्‍वरीत सिद्धरामय्या यांचा तब्बल ३६ हजार मतांनी झालेला पराभव काँग्रेस पक्षाला घायाळ करून गेला. 

लेण्यांचं शहर बदामीत तरी दमदार विजय मिळविण्याची आशा लावून बसलेल्या काँग्रेसला तेथेही झटावे लागले. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला निराशा आली; पण धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस)साथीने सत्ता स्थापनेत भाग घेता येत आहे, एवढेच समाधान मिळत आहे.

चामुंडेश्‍वरी मतदारसंघ तसा सिद्धरामय्या यांचा घरचा मतदारसंघ. येथून त्यांनी पाच वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले आहे. 

सिद्धरामय्या जेडीएसमधून बाहेर पडल्यानंतर चामुंडेश्‍वरीमधून पोटनिवडणूक लढवून ते केवळ २५७ मतांनी निवडून आले होते. तेथे सिद्धरामय्या यांचा ‘राजकीय पुनर्जन्म’ झाला होता; पण आता तेथे जेडीएसच्या जी. टी. देवेगौडा यांनी ३६ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. घरच्या मतदारसंघातील हा पराभव सिद्धरामय्या आणि काँग्रेसला फारच जिव्हारी लागला आहे.

चामुंडेश्‍वरीत सिद्धरामय्या यांना जेडीएसचे जी. टी. देवेगौडा यांनी मोठेच आव्हान निर्माण केले. सव्वा लाख मते त्यांनी घेतली आणि सिद्धरामय्या यांचा ३६ हजार मतांनी पराभव केला, तर बदामीतही भाजपच्या बी. श्रीरामुलू यांना टक्कर देताना सिद्धरामय्यांना केवळ १६९६ मतांनी विजय मिळविता आला.

सिद्धरामय्यांच्या पुत्राचा वरुणात विजय
चामुंडेश्वरी मतदारसंघात एकीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव झाला, तर त्यांचे पुत्र डॉ. यतिंद्र यांनी वरुणा मतदारसंघातून विजय मिळविला. वरुणा मतदारसंघात मात्र सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतिंद्र यांचा भर्जरी विजय झाला. त्यांना ९६४३५ मते मिळाली, तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे टी. बसवराजू यांना केवळ ३७८१९ मते मिळाली. धजदचे अभिषेक मानेगर यांना २८१२३ मतांवर समाधान मानावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com