esakal | Karnatka: बहुतांश आधुनिक महिलांना अविवाहित राहावेसे वाटते : के. सुधाकर
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर
बहुतांश आधुनिक महिलांना अविवाहित राहावेसे वाटते : के. सुधाकर

बहुतांश आधुनिक महिलांना अविवाहित राहावेसे वाटते : के. सुधाकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर, ता. १० ः भारतातील बहुतांश आधुनिक महिलांना अविवाहित राहावेसे वाटते; विवाह झाल्यानंतरही मुल जन्मास घालण्याची त्यांची इच्छा नसते, त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मातृत्व हवे असते...ही विधाने केली आहेत एका राज्याच्या मंत्र्याने. उल्लेखनीय बाब म्हणजे ते आरोग्य मंत्री असून डॉक्टर सुद्धा आहेत.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी ही विधाने केली आहेत. मुख्य म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिनी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जातंतू विज्ञान संस्थेच्या व्यासपीठावर ते बोलत होते. ही विधाने करताना खेद वाटतो, अशी भावना व्यक्त करून ते म्हणाले की, आपल्या विचारसरणीत किती बदल झाला आहे याचे हे उदाहरण आहे, जे काही चांगले नाही.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

कोविड-१९ आणि मानसिक आरोग्याबद्दल डॉ. सुधाकर म्हणाले की, आपले प्रियजन या विषाणूचे बळी ठरल्यानंतर त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेणेही नातेवाइकांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना मानसिक यातनांना सामोरे जावे लागले. जागतिक साथीमुळे सरकारला समुपदेशन सुरु करावे लागले. आतापर्यंत कर्नाटकात २४ लाख कोरोना रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. अशी कामगिरी इतर कोणत्या राज्यांनी केल्याची माहिती आपल्याला नाही.

संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी सांगितले, डिजिटल तसेच टेली-मेडीसीनच्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे.

सुधाकर यांचे मुद्दे

  • भारतीय समाजावरपाश्चात्यांचा पगडा

  • आई-वडिलांनी आपल्याबरोबर राहावे अशी इच्छाच नाही

  • आजी-आजोबांसह राहण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही

  • दर सात भारतीयांमागे एका व्यक्तीला मानसिक आजार, ज्याचे स्वरूप सौम्य, मध्यम किंवा गंभीर

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

तणावाचा सामना ही तर कला

डॉ. सुधाकर यांनी तणाव व्यवस्थापन

(स्ट्रेस मॅनेजमेंट) अर्थात ताणतणावांचा सामना करणे ही एक कला असल्याचे आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की, याबाबतीत भारतीयांना कुणाकडूनही शिकण्याची नव्हे, तर जगाला उपदेश देण्याची गरज आहे. एक भारतीय म्हणून आपण ही कला आत्मसात करण्यास शिकले पाहिजे. मग त्याचा सामना कसा करायचा हे जगाला शिकवावे, कारण योगा, ध्यानधारणा आणि प्राणायाम हे यावरील सुंदर उपाय आहेत, ज्याची शिकवण आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी दिली आहे.

loading image
go to top