बेहिशेबी मालमत्ता: कार्ती चिदंबरम "ईडी'समोर हजर

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

"आयएनएक्‍स' मीडिया कंपनीत परकी गुंवणुकीसाठी मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे. तपास अधिकाऱ्याने चिदंबरम यांना आज "ईडी'समोर हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार ते "ईडी' अधिकाऱ्यांसमोर हजर झाले

नवी दिल्ली -  कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) आज (गुरुवार) हजर झाले. "आयएनएक्‍स मीडिया'तील बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी "ईडी'समोर हजर राहण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.

"आयएनएक्‍स' मीडिया कंपनीत परकी गुंवणुकीसाठी मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे. तपास अधिकाऱ्याने चिदंबरम यांना आज "ईडी'समोर हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार ते "ईडी' अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. यापूर्वी 18 जानेवारी रोजी ते "ईडी'समोर हजर झाले होते. 2 फेब्रुवारीलाही त्यांना नोटीस बजावली होती. पण त्यांनी या वेळी उपस्थित राहण्यास अमर्थता दर्शविली होती. निषेध नोंदविण्यासाठी आपण "ईडी'समोर हजर झालो आहोत, असे मत कार्ती चिदंबरम यांनी तपास अधिकाऱ्यांकडे नोंदविले.

Web Title: Karti Chidambaram ed corruption