करूणानिधींचे प्रामाणिक समर्थक माझ्याच पाठिशी : एम. के. अलागिरी

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

करूणानिधींच्या निधनावेळी अलागिरी व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते. 'वडिलांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. तसेच मी कुटूंबियांवर नाही, तर पक्षावर नाराज आहे', असे अलागिरी यांनी सांगितले. 

चेन्नई : डीएमकेचे प्रमुख करूणानिधी यांच्या निधनानंतर प्रथमच पक्षाची मुख्य बैठक उद्या (ता. 14) होईल, या बैठकीत करूणानिधी यांच्यानंतर पक्षाचे पुढील कामकाज कोण बघेल यावर चर्चा होईल. करूणानिधी यांचा मुलगा स्टॅलिन हेच डीएमकेचे प्रमुख असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच चार वर्षांपूर्वी पक्षातून काढून टाकण्यात आलेले त्यांचे मोठे पुत्र एम.के अलागिरी यांनी पक्षाचे व करूणानिधी यांचे सर्व प्रामाणिक समर्थक हे अजूनही माझ्याच बाजूने असल्याचे म्हणले आहे.

करूणानिधींच्या निधनावेळी अलागिरी व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते. 'वडिलांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. तसेच मी कुटूंबियांवर नाही, तर पक्षावर नाराज आहे', असे अलागिरी यांनी सांगितले. 

करूणानिधी यांचा दुसरा मुलगा एम.के.स्टॅलिन हे पक्षाचे कामकाज बघत होते. करूणानिधींनी सामाजिक जीवनात येणे कमी केल्यापासूनच स्टॅलिन हे पक्षाचे काम बघतात. स्टॅलिन यांचे पक्षावर पूर्ण नियंत्रण असून तेच पक्षाचा पदभार सांभाळू शकतात, अलागिरी यांच्या वक्तव्याचा स्टॅलिन यांना काही फरक पडणार नाही, असे पक्षातील अंतर्गत नेत्यांचे म्हणणे आहे. 

अलागिरी यांना जानेवारी 2014 रोजी पक्षाविरोधात वक्तव्य केल्याने बडतर्फ करण्यात आले होते. 
 

Web Title: karunanidhi s loyalist are with me said elder son alagiri

टॅग्स