मुलीने महिलेला म्हटलं आंटी; भर बाजारात जुंपलेलं भांडण मिटवायला धावले पोलिस

up women and girl conflict in market
up women and girl conflict in market

लखनऊ - यंदा करवाचौथ 4 नोव्हेंबरला असून महिला बुधवारी त्याचं व्रत करणार आहे. यानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठीही महिलांची झुंबड उडाली आहे. कोरोनाच्या काळात सगळं ठप्प झालं होतं आणि त्यानंतर बाजारपेठा हळूहळू सुरू होत आहेत. यातच उत्तर प्रदेशातील एटा शहरामध्ये एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. बाजारात एका मुलीने महिलेला आंटी म्हटलं आणि दोघींमध्ये तिथेच जोरदार भांडण झाल्याचा व्हिडिओ लाइव्ह हिंदुस्तानने शेअर केला आहे.

करवाचौथनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेनं मुलीला चोपल्याचा प्रकार घडला आहे. मुलीने संबंधित महिलेला आंटी म्हणून हाक मारल्यानं तिला मारहाण करण्यात आली. आंटी असं म्हटल्यानं चिडलेल्या महिलेनं मुलीचे केस पकडून मारहाण करायला सुरुवात केली.

सोमवारी उशिरा एटा इथं एका दुकानात काही महिला खरेदी करत होत्या. त्यावेळी एका मुलीने महिलेला आंटी म्हणून हाक मारली. त्यानंतर महिलेनं मुलीशी वाद घालायला सुरुवात केली. दोघींमधील वाद इतका मोठा झाला की मारहाणही झाली. शेवटी पोलिसांना येऊन वाद मिटवावा लागला.

करवाचौथनिमित्त बाजारामध्ये करवा, दिवे, चाळणी यासह पूजनाचे साहित्य आणि कथेची पुस्तके विक्री होत आहेत. विवाहित महिला करवा चौथच्या आधी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करतात.  कपडे, ज्वेलरीसह इतर साहित्याने बाजारपेठाही सजलेल्या असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com