काश्मीरमध्ये स्कूल बसवर दगडफेक, दोन मुले जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

एकूण 35 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमधील रेहान गोरसाय व आणखी एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर 'एसएमएचएस' रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. 

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात स्कूल बसवर झालेल्या दगडफेकीत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यामध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमधील रेहान गोरसाय व आणखी एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर 'एसएमएचएस' रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. 

सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांनी शाळकरी मुलांनाही लक्ष केल्याने समाजाच्या सर्वच स्तरातून या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करून जखमींना न्याय दिला जाईल, असे ट्विट जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले. तसेच माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेची निषेध व्यक्त केला.

Web Title: In Kashmir Attack on a school bus two children are injured