'काश्‍मीर जळत असताना मोदी ढोल वाजवत आहेत'

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जुलै 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिका दौऱ्यावर टीका करताना ‘जम्मू-काश्‍मीर जळत आहे आणि मोदी ढोल वाजवण्यात व्यग्र आहेत‘, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिका दौऱ्यावर टीका करताना ‘जम्मू-काश्‍मीर जळत आहे आणि मोदी ढोल वाजवण्यात व्यग्र आहेत‘, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी ट्‌विटरद्वारे मोदींना लक्ष्य केले आहे. ‘काश्‍मीर जळत आहे. 21 लोक मृत्युमुखी पडले. सुरक्षा रक्षकांवर दररोज हल्ला होत आहे. अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे आणि मोदीजी ढोल वाजवत आहेत. किमान आता तरी उठा‘, असा सल्ला देत सूरजेवाला यांनी टीका केली आहे. काश्‍मीरमध्ये पीडीपी आणि भारतीय जनता पक्षाची युती असतानाही ते ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सूरजेवाला यांनी टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागूफुली यांच्यासोबत ढोल वाजवतानाचा फोटोही ट्‌विटरवर शेअर केला आहे. 

लष्कराशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुझाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वाणी ठार झाल्यानंतर काश्‍मीरमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. वाणीच्या मृत्युनंतर फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 23 जण ठार झाले आहेत.

Web Title: Kashmir is burning and Modi is busy playing drums : Congress