पुलवामामध्ये 'जैश'चा कमांडर ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

संबुरा भागात सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईत 50 राष्ट्रीय रायफल्स, विशेष मोहिमेतील जवान आणि पोलिसांचा समावेश होता. नूर आणि आणखी एक दहशतवादी घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पुलवामा - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील संबुरा भागात येथे भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर ठार झाला असून, अन्य एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील संबुरा येथे सुरक्षा रक्षकांनी कारवाई करत जैशचा कमांडर नूर मोहम्मद तांत्रेय उर्फ नूर त्राली हा ठार झाला असून, त्याच्यासोबत अन्य एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे. नूर मोहम्मद हा जैशचा दक्षिण काश्मीरमधील कमांडर होता. 

संबुरा भागात सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईत 50 राष्ट्रीय रायफल्स, विशेष मोहिमेतील जवान आणि पोलिसांचा समावेश होता. नूर आणि आणखी एक दहशतवादी घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Kashmir Indian forces kill Jaish e Mohammad commander in Pulwama says Defence Ministry