काश्‍मीरमध्ये पत्रकाराची गोळ्या घालून हत्या 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

श्रीनगर - ज्येष्ठ पत्रकार आणि रायझिंग काश्‍मीरचे संपादक शुजात बुखारी (वय 50) यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात बुखारी यांचा सुरक्षारक्षकही मारला गेला. हल्लेखोरांची संख्या किती होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या हल्ल्याचा गृहमंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध केला आहे. 

लाल चौक येथील प्रेस एन्क्‍लेव्ह येथील कार्यालयातून बुखारी हे इफ्तार पार्टीसाठी निघाले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी जवळून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारे दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र शुजात बुखारी आणि एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.

Web Title: In Kashmir, a journalist shot dead