आम्हाला जनावरांसारखे का बंद केले? सना मुफ्ती आक्रमक

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी सना मुफ्तीने यावर आपली प्रतिक्रिया देताना आम्हाला जनावरांसारखे का बंद केला असा प्रश्न केला आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी सना मुफ्तीने यावर आपली प्रतिक्रिया देताना आम्हाला जनावरांसारखे का बंद केला असा प्रश्न केला आहे. 

सना मुफ्तीने कलम 370 हटविण्याला विरोध केला असून या निर्णयामुळे काश्मीरमधील युवकांना फसवणूक झाल्यासारखे वाटत असल्याचे तिने म्हटले आहे. सना म्हणते, सरकार आमच्याशी खोटे बोलले आहे. आम्हाला राग व्यक्त करण्यास परवानगी दिली जात नाही. किती दिवस लोकांना घरात बंद करणार? जर हा निर्णय काश्मीर लोकांच्या भवितव्यासाठी आहे, तर त्यांना जनावरांसारखे बंद का केले आहे, असा सवाल सनाने केला आहे.

दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलताना म्हटले होते की 'आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. कलम 370 हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kashmir mehbooba mufti daughter sana mufti speaks against arrest leaders