काश्मीरमध्ये चकमकीत लख्वीचा भाचा ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

श्रीनगर- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व लष्करे तोयबाचा म्होरक्या झकी उर रेहमान लख्वी याचा भाचा अबू मुसैब हा काश्मीरमध्ये गुरुवारी (ता. 19) झालेल्या चकमकीत ठार झाला आहे.

पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील बंदीपोरा भागात असलेल्या हाजीनपासून 32 किलोमीटर अंतरावर दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानुसार जवानांनी परिसर ताब्यात घेतला होता. परिसर ताब्यात घेतल्यानंतर अबूने जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरवात केली. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात अबू जागीच ठार झाला. तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याची ओळख पटली आहे.

दरम्यान, अबू हा लष्करे तोयबाचा कमांडर होता. ऑगस्ट 2015 पासून बंदीपोरा भागात सक्रीय होता. विविध दहशतवादी कारवायांमध्ये तो सहभागी होता. श्रीनगरमध्ये 15 ऑगस्ट 2016 रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यातही अबूचा हात होता. लख्वीच्या आदेशानुसार तो कारवाया करत असे. दहशतवाद्यांसाठी निधी जमा करणे, शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याची व्यवस्था करणे व हिंसक आंदोलनांना चिथावणी देण्यासारखी कामे तो करत होता.

Web Title: kashmir: nephew of zaki ur rehman lakhvi gunned down in encounter