नमाजासाठी मुस्लिम जवानाला हिंदू अधिकारी देतोय संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

श्रीनगर : सुरक्षेसाठी तैनात असताना दुपारच्या वेळी एका मुस्लिमधर्मीय जवानाला नमाज पढण्यासाठी सहकार्य करत सीआरपीएफचा हिंदू धर्मीय अधिकारी त्याच्या शेजारी सशस्त्र उभा राहिला आहे, असे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कट्टरपंथीय मूलतत्त्ववादी काश्मीरमध्ये धर्माच्या नावावर फूट पाडून दहशतवादी कारवाया करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना भारतीय जवानांमध्ये मात्र विलक्षण एकी असल्याचे हे छायाचित्र दर्शवते. त्यामुळे सोशल मीडियावर आवर्जून हे छायाचित्र शेअर केले जात आहे. ही एकी म्हणजे कट्टरपंथीयांना एक प्रकारे जबरदस्त चपराकच असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत. 

देशसेवेसाठी कर्तव्य बजावताना जवान जात-धर्माच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य बजावतात. ‘शांततेसाठी शस्त्रसज्ज बंधू’ (Brothers-in-arms for peace) अशा शब्दांत वर्णन करत हे छायाचित्र केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: kashmir news CRPF hindu jawan protects muslim mate namaz