लष्कराच्या कारवाईत बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

श्रीनगर : जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी आणि बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी आणि बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाला आहे.

लष्कराला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लष्कराच्या 42 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने त्राल सेक्‍टरमधील सैमु गावात पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत दहशतवादी सबझर अहमदच्या घराला घेराव घातला. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी रात्री साडेसातच्या आसपास ही कारवाई करण्यात आली. घेराव घातल्यानंतर साधारण रात्री सव्वा नऊच्या सुमारास लष्कराने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज (शनिवार) सकाळपर्यंत लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत सबझर अहमद ठार झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. मात्र या वृत्ताला अद्याप लष्कराने दुजोरा नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अहमद हा त्राल येथील रात्सोना गावातील रहिवासी होता. बुरहाण वाणी ठार झाल्यानंतर हिज्बुल मुजाहिद्दीनमार्फत त्याने भारतविरोधी कारवाया करण्यास सुरूवात केली होती.

Web Title: kashmir news infiltraion terrorist indian troops indian military militant killed