काश्‍मीरमध्ये दोन दहशतवादी पकडले

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

श्रीनगर: हंडवाडा येथे हिज्बुल मुजाहिदीनच्या मॉड्यूलचा आज पर्दाफाश झाला. लष्कर आणि पोलिस यांच्या संयुक्त मोहिमेत हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले.

श्रीनगर: हंडवाडा येथे हिज्बुल मुजाहिदीनच्या मॉड्यूलचा आज पर्दाफाश झाला. लष्कर आणि पोलिस यांच्या संयुक्त मोहिमेत हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले.

हिज्बुलचा हंडवाडा मॉड्यूल एखादा मोठा घातपात घडवून आणणार असल्याची माहिती पोलिस आणि लष्कराला मिळाली होती. यासाठी दहशतवादी एका घरात लपल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार अतिशय गुप्ततेने मोहीम राबवत दोघांना ताब्यात घेतले. या वेळी कारवाईत पोलिसांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. दहशतवाद्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. अलीकडच्या काळात प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ लष्कराकडून अधिक सजगता बाळगली जात आहे. यादरम्यान घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत डझनभर दहशतवादी मारले गेले आहेत.

Web Title: kashmir news Terrorist captured in jammu-kashmir