अलिगड विद्यापीठाच्या रिसर्च स्कॉलरचा "हिझबुल मुजाहिदीन'मध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

आम्ही मन्नान याचे छायाचित्र सोशल मिडीयावर पाहिले आहे. मात्र त्याने या दहशतवादी संघटनेमध्ये प्रवेश केला आहे, याबाबतची नेमकी माहिती अद्यापी मिळालेली नाही. त्याचा फोन स्विच ऑफ असल्याने गेल्या 4 जानेवारीपासून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. आम्ही सध्या तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली आहे

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यामध्ये सक्रिय असलेल्या हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये भूगर्भशास्त्रामध्ये पीएच डी करणाऱ्या एका "रिसर्च स्कॉलर'ने प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले आहे. मन्नान वणी असे या तरुणाचे नाव असून तो कुपवाडा येथील आहे. सोशल मिडीयावर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका छायाचित्रामधून ही बाब स्पष्ट झाली आहे.

"आम्ही मन्नान याचे छायाचित्र सोशल मिडीयावर पाहिले आहे. मात्र त्याने या दहशतवादी संघटनेमध्ये प्रवेश केला आहे, याबाबतची नेमकी माहिती अद्यापी मिळालेली नाही. त्याचा फोन स्विच ऑफ असल्याने गेल्या 4 जानेवारीपासून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. आम्ही सध्या तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली आहे,'' असे मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमद याने सांगितले.

वनी याने याआधी दी कंपॅनियन डॉट कॉम या ऑनलाईन पोर्टलसाठी विद्यार्थी राजकारण या विषयावर काही लेख लिहल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Web Title: Kashmir research scholar ‘joins Hizbul’