
अमरनाथ यात्रेसाठी 'TRF'कडून धमकी, सरकार राजकारण करत असल्याचा आरोप
काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सैन्यदलासमोर अमरनाथ यात्रेचं आव्हान समोर उभं राहत आहे. अनेकवेळा या यात्रेवर दहशतवाद्यांच लक्ष असल्याची माहिती मिळत असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये जराही हलगर्जी झाली तर यात्रेवरसुद्धा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असं सुरक्षा दलाचं मत आहे. यावर्षी अमरनाथ यात्रा जूनमध्ये सुरू होणार आहे. कोरोनामुळे यात्रा दोन वर्ष रद्द झाली होती. त्यानंतर आता अमरनाथ यात्रेबद्दल भाविकांमध्ये उत्साह आहे. यावेळी अमरनाथ यात्रेत लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. या यात्रेवर आता दहशतवादाचं सावट आहे. या यात्रेला 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये या यात्रेदरम्यान हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा: तालिबानमध्ये पाकिस्तानचा हवाई हल्ला, ४७ ठार
यासंदर्भात आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. अमरनाथ यात्रेचं राजकारण केल्याचा आरोप होत आहे. काश्मीरच्या दहशतवादी संघटना टीआरएफनं हा अरोप केला असून TRF च्याने जनतेला सरकारच्या या अजेंड्याचा भाग न होण्यास सांगितलं आहे. सरकार लोकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही या संघटनेनं केला आहे. दरवर्षी 15 हजार यात्रेकरुंऐवजी आता आठ लाख लोक अमरनाथ यात्रेला येणार आहेत. तसेच 15 दिवसांऐवजी 75 दिवसांची यात्रा होणार आहे. यामुळे अमरनाथ यात्रेचं राजकारण होत आहे. तीन लाख भाविक पवित्र गुहेचत दर्शन घेऊ शकतील आणि यात्रा 75 दिवस चालेल, अशी घोषणा श्राइन बोर्डाकडून करण्यात आली. सरकारला या पवित्र स्थळाचं भगवीकरण करायचं आहे, असं टीआरएफनं म्हटलं आहे.
हेही वाचा: UPSC म्हणजे केंद्रीय प्रचार संघ आयोग : राहुल गांधी
या माहितीमुळे जम्मू-काश्मिर सरकारने अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गाला अतीसंवेदनशील घोषित केलं आहे. तसंच भाविकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशसुद्धा सरकारने सैन्य दलाला दिले आहेत. या यात्रेच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मिर सरकारने महत्त्वाचे निर्देश काढले आहेत. लष्कर, पोलिस आणि इतर सुरक्षा दलांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आलेत. गुप्तचर संस्था आणि एकिकृत मुख्यालयातून मिळणारे आदेश आणि माहिती याची चाचपणी करण्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे कुठल्याही संभाव्य दुर्घटनेला रोखता येइल.
Web Title: Kashmir Terror Group Trf Says Threat Of Amarnath Yatra Fascist Regime And Politics In India On Yatra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..