काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी मिळतात 500 ते पाच हजार रुपये

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

जम्मू-काश्‍मीरमधील आंदोलकांचे "स्टिंग'

श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांवर जी दगडफेक होते त्यासाठी आंदोलकांना पैसे दिले जातात, असा खुलासा एका स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनीच ही बाब कॅमेऱ्यासमोर सांगितली. मी 2008 पासून दगडफेक करण्याचे काम करत असून, मला एका दिवसाला 500 रुपये ते 5 हजार रुपये मिळतात. बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतरही आपण दगडफेक केल्याचे एका आंदोलकाने सांगितले.

एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आंदोलकांनी ही बाब सांगितली. झाकिर अहमद भट या दगडफेक करणाऱ्या आंदोलकाने सांगितले, की आम्हाला या कामासाठी पैसे, कपडे आणि बूटही दिले जातात. हे पैसे कुणाकडून येतात या बाबत आम्हाला फारशी माहिती नाही. मला असिफ नावाचा एक मित्र पैसे आणून देत असे. मी फेकलेल्या दगडामुळे अनेक पोलिस अधिकारी आणि जवान जखमी झाल्याचे फारुक या आंदोलकाने सांगितले. जर पोलिसांनी आम्हाला पकडले तर आम्ही पैशाबाबत कधीही सांगत नाहीत, असे फारुकने म्हटले.

या दगडफेक करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असते. त्यामुळे दगडफेक झाल्यानंतर आम्ही घरी काही दिवसांसाठी जात नाही, असे या आंदोलकांनी सांगितले. दगडफेकीबाबतच्या सूचना एका व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे दिल्या जातात, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा व्हॉट्‌सऍप ग्रुप पाकिस्तानमधून चालवला जातो, असे त्यांनी म्हटले आहे. व्हॉट्‌सऍपद्वारे पोलिस आणि लष्कर कुठे आहे, याबाबत सांगितले जाते. त्यांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना आधीच मिळते, असे ते म्हणाले. ज्या वेळी संघर्षाला सुरवात होते त्या वेळी कोणत्या ठिकाणी जाऊन दगडफेक करायची, किती वेळ करायची, याच्या सूचना व्हॉट्‌सऍपवर दिल्या जातात, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kashmir youth got 500 to five thousand; gets the stone