
पाकिस्तानी वंशाच्या काश्मिरी सुनांनी सोमवारी सरकारकडे केली आहे. त्यांना भारताचे नागरिक समजले जात नसल्याचे कारण त्यांनी यासाठी दिले आहे. या महिलांचे पती पूर्वी दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.
श्रीनगर - पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पाठविण्याची विनंती पाकिस्तानी वंशाच्या काश्मिरी सुनांनी सोमवारी सरकारकडे केली आहे. त्यांना भारताचे नागरिक समजले जात नसल्याचे कारण त्यांनी यासाठी दिले आहे. या महिलांचे पती पूर्वी दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. नंतर सरकारच्या आत्मसमर्पण योजनेत त्यांनी शरणागती पत्करली व आता ते सामान्य जीवन जगत आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना त्या आज म्हणाल्या की, आम्हाला घरी जाण्याची परवानगी देण्याची लेखी मागणी पाकिस्तानच्या दूतावासाकडून भारतीय अधिकाऱ्यांनी दर महिन्याला करण्यात येते. कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्हाला घरी जाण्यास भारतीय सरकारने परवानगी द्यावी. येथील सरकार आम्हाला भारतीय नागरिक मानत नाही, मग आम्हाला आमच्या घरी का पाठवत नाही, असा सवाल त्यांनी केला. यासाठी आम्ही सगळ्यांची भेट घेतली, पण कुणीही आमच्या समस्येकडे लक्ष दिले नाही, असा दावा या महिलांनी केला.
आज दिवसभरात: मनसेचा राडा ते ममतांना धक्का! महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
मूळ पाकिस्तानी असलेली सोमिया सदफ या काश्मिरी सूनेने नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक लढविली होती. तिची उमेदवारी स्वीकारण्यात आली, पण आम्ही आमच्या प्रश्नांवर आवाज उठवला की कोणतेही कारण न देता सरकारने त्याठिकाणची मतमोजणी थांबविली, अशी तक्रार या महिलांनी केली.
जर मी काही चूक केली होती, तर माझा उमेदवारी अर्ज आधी का स्वीकारण्यात आला. आम्हाला भारताचे नागरिक समजले जात नसेल तर सरकारने आम्हाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवावे.
बुशेरा, पाकिस्तानी वंशाची काश्मिरी महिला
Gold Price - सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे भाव