काश्मिरी युवक 500-1000साठी मरत नाहीत- उमर

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील प्रमुख मुद्दे जाणून घेण्याची गरज असून, त्या दिशेने काम करण्याची गरज आहे. काश्मिरमधील युवक 500-1000 रुपयांसाठी मरत नाहीत, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

दोडा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, 'नेहमीच भ्रमावस्थेत राहण्यापेक्षा राज्यातील प्रमुख मुद्दे समजून घेण्याची गरज आहे. शिवाय. त्या दिशेने काम करायला हवे. काश्मीर हा एक राजकीय मुद्दा आहे. राज्यात शांतता लाभण्यासाठी राजकीय समाधानाचीही आवश्यकता आहे.'

काश्मीरची परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून खूपच भयानक झाली असून, येथील अर्थ व कायदा व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. राज्यात शांतता पसरण्यासाठी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर खुली चर्चा व्हायला हवी, असेही अब्दुल्ला म्हणाले.

Web Title: kashmiri youths dont die for 500-1000 notes-omar abdullah