काश्‍मीरमध्ये लोक मारले जात आहेत : मेहबुबा मुफ्ती

सुरक्षेच्या कथित उपायानंतरही स्थिती बिघडली
mehbuba_20mufti_
mehbuba_20mufti_

जम्मू : सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही असूनही काश्मीरमध्ये लोक मारले जात आहेत, असा दावा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

सोमवारी श्रीनगरमध्ये महंमद इब्राहिम खान या विक्रेत्याला गोळ्या घालून मारण्यात आले. त्याआधी रविवारी पोलिस कॉन्स्टेबल तौसीफ अहमद वनी याला मारण्यात आले होते. गेल्या महिन्यात ११ नागरिक मारले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मेहबूबा यांनी मंगळवारी त्यांनी ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेची स्थिती इतकी बिघडली आहे की एखाद्या निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला नाही असा एकही आठवडा उलटत नाही.

mehbuba_20mufti_
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

सुरक्षेची उपाययोजना या नावाखाली दडपशाही सुरु असली तरी लोक मारले जाणे, स्वाभिमानाची भावना जाणे, परिस्थिती सामान्य नसणे हे दुर्दैवी आहे. परिस्थिती सामान्य असल्याचा सरकारचा दावा वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर शेकडो युवकांना अटक करण्यात आली. दौरा पार पडल्यानंतरही हे सुरुच आहे, असा दावाही त्यांनी केला.

पीएम केअर्सवरूनही मोदींवर टीका

पीएम केअर्स फंड योजनेवरूनही मेहबूबा यांनी आरोप केला. ही योजना म्हणजे भ्रष्टाचाराचा सुसंस्कृत मार्ग आहे. या निधीसाठी मिळालेल्या रकमेचा तपशील जाहीर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तयारी नाही, असे त्या म्हणाल्या. या योजनेतून देण्यात आलेल्या व्हेंटीलेटर्समध्ये बिघाड असल्याचे काश्मीरच नव्हे तर गुजरातमध्येही आढळून आल्याचा दावाही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com