कठुआ बलात्कार प्रकरणात भाजपकडून राजकारण - मुफ्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जम्मू काश्मिरमधील भाजप सरकारला अशा नेत्यांमुळे व या आरोपांमुळे नुकसान होत आहे. राज्यातील भाजपच्या इतर नेत्यांनी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केला आहे. जम्मू काश्मिर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. 

नवी दिल्ली : काश्मिरमधल्या कठुआ या भागातील 8 वर्षीय मुलीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने सामुहिक बलात्कार व तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या संबंधी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या संबंधी चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी (ता. 11) केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.  

जम्मू काश्मिरमधील भाजप सरकारला अशा नेत्यांमुळे व या आरोपांमुळे नुकसान होत आहे. राज्यातील भाजपच्या इतर नेत्यांनी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केला आहे. जम्मू काश्मिर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. 

गृहमंत्र्यांनी जम्मू काश्मिरमधली तणावाची स्थिती व सुरक्षा याबाबत चर्चा केली व त्याचबरोबर ही स्थिती पूर्ववत कशी आणता येईल याबाबत प्रयत्न करण्यास सांगितले.

कठुआ येथील 8 वर्षीय मुलीचे 10 जानेवारीला अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून बलात्कार करण्यात आला. तिचा मृतदेह 17 जानेवारीला सापडला. न्यायवैद्यक चाचणीच्या अहवालाप्रमाणे तिच्यावर अतिशय वाईट प्रकारे अत्याचार झाल्याचे समोर आले. यानंतर हे प्रकरण सीबाआयकडे चौकशीसाठी देण्यात आले व जम्मू काश्मिर उच्च न्यायालय या प्रकरणाचे परिक्षण करत आहे. चौकशीचे सर्व अहवाल हे जम्मू काश्मिर उच्च न्यायालयाला देण्यात आले आहेत. 

 

 

Web Title: kathua gang rape case bjp leaders create politics said by mehabuba mufti