कठुआ बलात्कार पीडितेची ओळख उघड करणाऱ्या माध्यमांना 10 लाखांचा दंड

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणांमधील पीडितेचे नाव उघड न करण्याचे संकेत आहेत. असे असताना माध्यमांकडून पीडितेचे नाव बातम्यांमध्ये वापरले गेले. त्यामुळे न्यायालयाने माध्यमांना फटकारले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील कठुआ येथे आठ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यातील बलात्कार पीडिता बालिकेची ओळख ज्या माध्यमांनी उघड केली, अशा माध्यमांवर दिल्ली उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. उच्च न्यायालयाने अशा माध्यमांना नोटीस पाठवली असून, 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे. 

delhi high court

ज्या माध्यम समूहांनी कठुआ येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख उघड केली, अशा माध्यमांवर न्यायालयाने कारवाईचे संकेत दिले. पीडित बालिकेची ओळख उघड करणाऱ्या माध्यमांना नोटीस पाठविण्यात आली असून, त्यांना 10 लाखांचा दंडही ठोठाविण्यात आला आहे. त्यानंतर ही दंडाची रक्कम जम्मू-काश्मीरच्या नागरी सहाय्यता निधीमध्ये जमा केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणांमधील पीडितेचे नाव उघड न करण्याचे संकेत आहेत. असे असताना माध्यमांकडून पीडितेचे नाव बातम्यांमध्ये वापरले गेले. त्यामुळे न्यायालयाने माध्यमांना फटकारले.

Web Title: Kathua Gang Rape Girl Identity Disclose by media Delhi High Court Fine 10 lakh involved media