कठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी आता पंजाबमध्ये

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

राजकिय लोकांचा हात असल्याच्या कारणाने या प्रकरणाची सुनावणी जम्मू कश्मीरमध्ये होऊ नये अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

नवी दिल्ली - जम्मू कश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने पू्र्ण देश ढवळून निघाला होता. या प्रकरणाची पूर्ण देशभरात दखल घेण्यात आली होती. या प्रकरणात काही राजकिय लोकांचा हात असल्याच्या कारणाने या प्रकरणाची सुनावणी जम्मू कश्मीरमध्ये होऊ नये अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

सरन्यायधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने ही मागणी मान्य केली आहे. आता या खटल्याची सुनावणी पंजाबमधील पाठकोट न्यायालयात होणार आहे. परंतु याबरोबर या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची करण्यात आलेली मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

Web Title: kathua gangrape case trial transferred to panjabs pathankoth court