कठुआ प्रकरण : महिला वकिलालाही बलात्काराच्या धमक्या

वृत्तसंस्था
सोमवार, 16 एप्रिल 2018

महिला वकिल दीपिका सिंह राजावत यांना ही केस घेतल्या पासून धमक्या येत आहेत. तुझीही अशाच प्रकारे बलात्कार करून हत्या केली जाईल, तुला माफ केलं जाणार नाही अशा धमक्या त्यांना येत आहेत. त्याचबरोबर त्यांना न्यायालयात प्रॅक्टिस करण्यापासून रोखण्यात येत आहे. बार असोसिएशनही मदत करत नाही. तसेच मी हिंदू असून मुस्लिम मुलीची केस स्विकारल्याने मला हिंदू धर्मातून काढून टाकण्याचीही माहिती मला मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

जम्मू काश्मिर : कठुआ येथे आठ वर्षीय असिफावर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी आज न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी असिफाचे वकिलपत्र घेतलेल्या दीपिका सिंह राजावत यांनाही बलात्काराच्या व हत्येच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण व सुनावणी जम्मू-काश्मीरबाहेरील कोर्टात सादर केलं जावं, अशी त्यांची मागणी आहे. 

10 जानेवारीला जम्मू-काश्मिर येथील कठुआ या गावातील असिफा या 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला व त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आज त्यातील आठ आरोपींवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

महिला वकिल दीपिका सिंह राजावत यांना ही केस घेतल्या पासून धमक्या येत आहेत. तुझीही अशाच प्रकारे बलात्कार करून हत्या केली जाईल, तुला माफ केलं जाणार नाही अशा धमक्या त्यांना येत आहेत. त्याचबरोबर त्यांना न्यायालयात प्रॅक्टिस करण्यापासून रोखण्यात येत आहे. बार असोसिएशनही मदत करत नाही. तसेच मी हिंदू असून मुस्लिम मुलीची केस स्विकारल्याने मला हिंदू धर्मातून काढून टाकण्याचीही माहिती मला मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

हे प्रकरणाची जम्मू-काश्मीरबाहेर सुनावणी व्हावी यासाठी पीडितेचे कुटुंबिय सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या प्रकरणी आरोपींना मिळत असलेल्या आधारामुळेच वकिलांनाही अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत, तसेच पीडितेचे कुटुंबिय ही भीतीच्या छायेत आहेत. 

Web Title: Kathua gangrape victim’s lawyer Being called I can be raped or killed