कठुआसारखी घटना अत्यंत लाजिरवाणी : राष्ट्रपती

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

आपण कोणत्या प्रकारचा समाज विकसित करत आहोत, याबाबत आपल्याला विचार करावा लागणार आहे. कोणतीही महिला किंवा मुलीसोबत असे प्रकार घडू नयेत, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

नवी दिल्ली : एखाद्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हास्य ही जगातील सर्वात सुंदर बाब आहे. त्यामुळे या निष्पापांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, अद्यापही देशातील बहुतांश भागांत अनेक निष्पाप मुलींना अशा घटनांचा सामना करावा लागत आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेचा निषेध केला.

Ramnath kovind

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, आपण कोणत्या प्रकारचा समाज विकसित करत आहोत, याबाबत आपल्याला विचार करावा लागणार आहे. कोणतीही महिला किंवा मुलीसोबत असे प्रकार घडू नयेत, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे झाली तरीही देशाच्या कोणत्याही भागात कठुआ अत्याचारासारखी घटना घडणे ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. 

दरम्यान, मणिपुरची मेरी कोम, माराबाई छानू आणि संगीता छानू, हरियाणाची मनू भोकर आणि विनिश फोगाट, तेलंगणाची सायना नेहवाल, पंजाबची हीना सिद्धू आणि दिल्लीची मणिका बत्रा या महिला खेळाडूंनी संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी या सर्वांचे कौतुक केले.

Web Title: Kathua Incident Occurring In Any Part Of The Country Is Shameful Says President Ramnath Kovind