मला सल्ला देणाऱ्यांनी आता स्वतः बोलावे: डॉ. मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

नवी दिल्लीः कथुआ, उन्नाव येथील बलात्कार प्रकरणासह देशातील महत्त्वाच्या घटनांबाबत मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जोरदार टीका केली आहे. मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्यांनी आता स्वतः बोलावे, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे.

डॉ. मनमोहनसिंग यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, "कधी काळी मला मौनी मनमोहनसिंग असे हिणवले जात होते व बोलण्याचा सल्ला मोदींनी दिला होता. आता त्यांनी स्वतःच त्या सल्ल्याप्रमाणे वागावे. त्यांनी काही तरी बोलावे.''

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कार्यक्रमात मोदींनी मौन सोडले. "ते काही तरी बोलले, याचे समाधान वाटते. त्यांनी वारंवार बोलले पाहिजे. दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर आमच्या सरकारने कायद्यात बदल करून तो अधिक कठोर केला,'' असे डॉ. मनमोहनसिंग म्हणाले. कथुआ प्रकरण मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी गंभीरपणे हाताळायला हवे होते. कदाचित त्यांच्यावर मित्रपक्ष भाजपचा दबाव असेल, अशी टीकाही मनमोहनसिंग यांनी केली आहे.

Web Title: kathua news advisers should tell me now: Dr. Manmohan Singh