कठुआ बलात्कारातील नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या : मनेका गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ येथे आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या गंभीर प्रकरणानंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर मनेका गांधी म्हणाल्या, महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून पॉस्को कायद्यांतर्गत कॅबिनेट नोट काढण्यात येईल.

नवी दिल्ली : कठुआ सामूहिक बलात्कारप्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळत आहे. कठुआ येथील आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणातील नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या, असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले. तसेच कठुआसारख्या अत्यंत क्रूर अशा घटनेमुळे मी अत्यंत चिंतेत आहे, असेही मनेका गांधी म्हणाल्या.

Kathua case

जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ येथे आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या गंभीर प्रकरणानंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर मनेका गांधी म्हणाल्या, महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून पॉस्को कायद्यांतर्गत कॅबिनेट नोट काढण्यात येईल. कठुआ येथील सामूहिक बलात्कार आणि इतर काही बलात्कारांची माहिती मिळाल्यानंतर मी अत्यंत चिंतेत आहे. मी आणि माझ्या मंत्रालयाने पॉस्को कायद्यांतर्गत 12 वर्षाखालील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, यासाठी नवी दुरुस्ती करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मनेका गांधी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली.  

10 जानेवारीला आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. मात्र, हिंदू समाजातील काही लोक त्याच्या बचावासाठी पुढे आले होते. यातील आरोपी हिंदू समाजातील असून, पीडित मुलगी ही मुस्लिम समाजातील बकेरवाल समाजातील होती.  

Web Title: Kathua Rape Case To Ask For Death Penalty For Child Rape says Maneka Gandhi