तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून वीरभ्रद स्वामीला सोन्याच्या मिशीचे दान!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

हैदराबाद - तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील कुर्वी येथील वीरभद्र स्वामी मंदिराला सोन्याची मिशी दान केली आहे.

हैदराबाद - तिरुमला मंदिराला 5.6 कोटी रुपयांचे दागिने दान केल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील कुर्वी येथील वीरभद्र स्वामी मंदिराला सोन्याची मिशी दान केली आहे.

तिरुमला मंदिराला केलेल्या दानावरून जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करत विरोधकांनी राव यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांनी वीरभद्र स्वामी मंदिराला 75 हजार रुपयांची मिशी दान केली आहे. एखाद्या कार्यात यश मिळाल्यानंतर तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील मंदिरांमध्ये दान करण्याची राव यांना सवय आहे. यापूर्वीही त्यांनी वारंगल येथील भद्रकालीला 3.65 कोटी रुपयांचे दागिने दान केले होते. तर विजयवाडा येथील कणका दुर्गा मंदिराला नाक दान केले होते.

Web Title: KCR offer 'gold moustace' to Kuravi Veerbhadra Swami Temple