लोकसभा निवडणुकीकडे लक्ष ठेवूनच सरकारमधून भाजप बाहेर

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

भारतीय जनता पक्षाने जम्मू काश्‍मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा आगामी 2019 मधील लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतल्याची भावना अनेकांची आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काश्‍मीर खोऱ्याचा दौरा केल्यानंतर जो अहवाल सादर केला आहे, त्यात नमूद करण्यात आले आहे. 

श्रीनगर: भारतीय जनता पक्षाने जम्मू काश्‍मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा आगामी 2019 मधील लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतल्याची भावना अनेकांची आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काश्‍मीर खोऱ्याचा दौरा केल्यानंतर जो अहवाल सादर केला आहे, त्यात नमूद करण्यात आले आहे. 

मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचे कारण काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थिती, असे भाजप देत असले तरीसुद्धा स्थानिक नागरिकांच्या मते 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवूनच एका मोठ्या रणनीतीचा हा भाग आहे, असे सिन्हा यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 80 वर्षीय सिन्हा यांनी विद्यमान भाजप नेतृत्वावर टीका करीत एप्रिलमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी "लोकशाही वाचवा'ची मोहीम देशभर राबविणार असल्याची घोषणा केली होती. 
 

Web Title: Keep in mind the Lok Sabha elections, the BJP out of the government